इस्रायलचा तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवर हल्ला, सर्वत्र ढिगारा अन्‌‍‍ व्हीलचेअरही विखुरल्या, रुग्ण होरपळले

Foto
तेहरान : गाझापट्टीत रुग्णालये, शाळा नागरी वस्त्यांमध्येही नरसंहार केल्यानंतर आता तेच धोरण इस्त्रायलने इराणमध्ये सुरु केलं आहे. उत्तर तेहरानमध्ये असलेल्या गांधी रुग्णालयावर इस्रायलने हवाई हल्ले केले. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर सुरू केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी हा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सर्व रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात () आले आहे. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये रुग्णालयात सर्वत्र ढिगारा आणि व्हीलचेअर विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्या.
 
इराणच्या  या वृत्तसंस्थेने या घटनेला थेट झिओनिस्ट-अमेरिकन हवाई हल्ला असे संबोधले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी आणि लष्कराने त्यांची 100  लढाऊ विमान केवळ इराणचे अणू आणि लष्करी तळ, हवाई दल आणि सरकारी इमारतींना लक्ष्य करत आहेत. मात्र, गांधी रुग्णालयासारख्या नागरी वैद्यकीय सुविधेवर झालेला हा हल्ला इस्रायलने जाहीर केलेल्या लष्करी लक्ष्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

इराण आणि इस्रायलच्या या संघर्षात रुग्णालयांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2025 मध्ये इस्रायलने सीमेजवळील करमनशाह शहरातील फराबी रुग्णालयावर क्षेपणास्त्रे डागली होती. याशिवाय, जून 2025 मध्ये दक्षिण तेहरानमधील हकीम बाल रुग्णालयाच्या परिसरात इस्रायली ड्रोनने हल्ला केला होता, तसेच आरोग्य सेवा केंद्रे आणि सहा रुग्णवाहिकांवरही हल्ले करण्यात आले होते.

अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा तिसरा दिवस

दरम्यान, इस्रायल आणि अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा तिसरा दिवस आहे. अल-जझीराच्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे 1 हजारहून अधिक इराणी ठिकाणांवर हल्ला केला आहे, पहिल्या 30 तासांत 2 हजारहून अधिक बॉम्ब टाकले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले आहे की, येत्या काही दिवसांत तेहरानवरील हल्ले तीव्र होतील. इस्रायलने इस्रायलसह नऊ देशांमधील अमेरिकन तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षाच्या पहिल्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे,हिजबुल्लाह देखील या संघर्षात सामील झाला आहे, त्यांनी इस्रायलमधील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले आहेत. दरम्यान, इस्रायलने सीमेवरील 50 लेबनीज गावे रिकामी केली आहेत.

200 जण ठार, 740 जण जखमी

इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह 10 प्रमुख शहरांना लक्ष्य केले आहे. आतापर्यंत 200 हून अधिक लोक ठार आणि 740 हून अधिक जखमी झाले आहेत. एका शाळेवर क्षेपणास्त्राचा हल्ला झाला, ज्यामध्ये 180 विद्यार्थिनी ठार झाल्या आणि 45 जण जखमी झाले.